गूगल फॉर्म कसा तयार करावा? Google form in Marathi- Google forms information in Marathi

Google form in marathi- google form marathi information

 

Googleforminmarathi:- तुम्हाला माहीत आहे का गुगल फॉर्म्स म्हणजे काय? Googleformsका आणि कसे वापरले जाते? “Google Forms” ही Google ने सुरू केलेली अतिशय चांगली सेवा आहे जी कोणत्याही प्रकारचे फॉर्म किंवा सर्वेकरण्यासाठीलागणारी ऑनलाइन पेजेसतयार करण्यासाठी वापरली जाते. ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.आज या पोस्टमध्ये आम्ही Google Forms बद्दल तपशीलवार पाहणार आहोत. म्हणून ही पोस्ट पूर्णपणे वाचा. चला तर पाहुयात.

 

google form in marathi
google form in marathi

 

 

 

Google form म्हणजे काय? What is google forms in Marathi?

 

Google form हे web-based-onlinetool आहे. ज्याप्रकारे आपण, मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या टूल्सच्या वापर करतो, त्याचप्रकारे गूगलने डॉक्युमेंट्स, सर्वे, एक्सेल शिट्स, स्लायडर, इत्यादि. तयार करण्यासाठी ऑनलाइन टूल्सचा एक संग्रह तयार करून लॉंच केला, त्यालाच ‘google forms’ असे म्हणतात. गूगल ने फॉर्मचे काही नमुने तयार केले. ज्यांना केवळ एडिट करून आपण पाहिजे असलेला फॉर्म तयार करू शकतो. तसेच खूप सारे टेंप्लेट समाविष्ट असल्याने आपण ह्यात पाहिजे तसे फॉर्म डिझाईन करू शकतो. Google forms द्वारे प्रश्न-उत्तरांची क्रिया देखील केली जाते. सर्वे करण्यासाठी google form चा वापर सोयिस्कर आहे. शैक्षणिक कामांत सर्वे करण्यासाठी ह्याचा सर्वाधिक उपयोग केला जातो. तसेच वापरकर्त्यास कंटेंट फॉर्म्स, जॉब प्रोफाइल, एखाद्या विषयावर सर्वे करणे आणि डेटा पाहणे, आपल्या ग्राहकांचे फीडबॅक घेणे,अशा कामांसाठी ह्याचा उपयोग होतो. ह्याद्वारे प्राप्त होणारी माहिती(डेटा) ही ईमेल द्वारे आपण माहीत करू शकतो किंवा google form च्या वेबसाइटवर आपण तपासू शकतो. 

 
 

 

Google form मध्ये लॉगिन कसे कराल? How to login in google form?

1. सर्वात प्रथम, google वर जा आणि सर्च बॉक्समध्ये google form असे टाइप करा.

2. येणार्‍या सर्च रिजल्टमध्ये google forms अशी हेडिंग असलेल्या लिंकवर क्लिक करा.

3. त्यानंतर तुम्हाला जीमेल आयडी विचारला जाईल किंवा तुमच्या ब्राऊजरमध्ये जीमेल लॉगिन असल्यास सरळ तुम्हाला google forms मध्ये प्रवेश दिला जाईल.

4. आता, तुम्ही google forms मध्ये प्रवेश केला असणार, त्याचा homepage वर तुम्हाला टेंप्लेट तसेच काही फीचर दिलेले आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही फॉर्म्स तयार करू शकतात.

 

 

Google फॉर्म कसा तयार करावा? How to create google forms marathi?

 

1. सर्वात प्रथम google forms ओपेन करा. Google forms मध्ये साइन-इन झाल्यानंतर तुमच्यासमोर Personal आणि Google workspace हे दोन ऑप्शन दाखवले जातील. व्यक्तीगत कामासाठी Personal तर व्यावसायिक कामसाठी Google Workspace हे ऑप्शन निवडावे. तुम्ही व्यक्तिगत कामासाठी google forms चा वापर करत असल्याने Personal ह्या ऑप्शनवर क्लिक करा.

 

2. तुमच्यासमोर google forms चे homepage उघडून येईल. तेथे तुम्हाला विविध template दिलेले असतील. नवीन फॉर्म तयार करण्यासाठी, homepage वरील प्लस(+) ह्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यांतर तुम्हाला एक ब्लॅंक फॉर्म दिला जाईल. त्याचे नाव ‘untitled form’असे दाखवले जाईल. त्याला खोडून तुम्ही फॉर्मचे शीर्षक देऊ शकता.    

 

3. तुम्ही untitled form ला नाव दिल्यानंतर खाली फॉर्मची सुरुवात होईल. Form description च्या जागी तुमच्या form विषयी माहिती द्या. त्यानंतर प्रश्न-उत्तरे किंवा इतर घटक तयार करून तुम्ही तुमचा google form तयार करू शकतात.

 

4. ह्या फॉर्म मध्ये तुम्ही पाहिजे तेवढे प्रश्न आणि त्यांचे ऑप्शन (पर्याय) तयार करू शकता. Untitled Question ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. Add Option ह्या बटनावर क्लिककरून तुम्ही पाहिजे तेवढे option(पर्याय) तयार करू शकता.

 

5. तुम्ही google form तयार करत असताना preview देखील बघू शकता. त्यासाठी preview ह्या बटनावर क्लिक करा.

 

 

Google फॉर्म मधील महत्वाचे settings- Important Options in Google Forms in Marathi

Start a new Form:- हे ऑप्शन google forms च्या होमपेजवर असते. हे प्लस (+) ह्या चिन्हाने देखील दर्शवले जाते. ह्यावर क्लिक करून तुम्ही नवीन Google form तयार करू शकता. 

Untitled Form:- तुम्ही नवीन फॉर्म तयार करत असल्यास ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फॉर्मला शीर्षक देऊ शकता. उदा:तुमचा फॉर्म विद्यार्थी माहिती घ्यावयासाठी तयार करत असल्यास तुम्ही Untitled form हे शीर्षक खोडून विद्यार्थी माहिती असे नवीन शीर्षक देऊ शकता.

Form Description:- तुमचा फॉर्म विषयी थोडक्यात माहिती तुम्ही form description ह्या ऑप्शनमध्ये लिहू शकता. फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरवण्यामागचा हेतु, फॉर्म भरतांना दिल्या जाणार्‍या विशेष सूचना, अशा प्रकारची माहिती तुम्ही ह्या ऑप्शनद्वारे इतरांना देऊ शकता.

Multiple Choice:- तुमच्या फॉर्मला रूप देण्यासाठी ह्या ऑप्शनचा तुम्ही वापर करू शकता. फॉर्ममध्ये विचारली गेलेली प्रश्न व त्यांचे उत्तर ह्यांना एडिट करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो.

Add Questions:- ह्या ऑप्शनद्वारे तुम्ही नवीन प्रश्न तयार करू शकता. एकापेक्षा जास्त प्रश्न फॉर्ममध्ये समाविष्ट करण्यासाठी ह्याचा उपयोग करा.

T-icon:- ह्या द्वारे तुम्ही नवीन title आणि description देऊ शकता.  

Image Icon ह्या ऑप्शनद्वारे तुम्ही फॉर्ममध्ये Image इन्सर्ट करू शकता. Image iconवर क्लिक केल्यास एक pop-up उघडून येते आणि त्यात इमेज इन्सर्ट करण्यासाठी Google drive आणि फाइल मॅनेजर सारखे ऑप्शन दिले जातात. पाहिजे ती इमेज निवडून तिला फॉर्ममध्ये समाविष्ट करता येते.

Video Icon– इमेज प्रमाणेच विडियो आयकॉनचा उपयोग हा विडियो इन्सर्ट करण्यासाठी केला जातो. तुम्ही ह्यात यूट्यूब वरून विडियो इन्सर्ट करू शकता. ह्यासाठी पाहिजे असलेला विडियो सर्च करून किंवा यूट्यूब विडियो लिंकद्वारे तुम्ही विडियो इन्सर्ट करू शकता.

Section Icon:- ह्या बटनादारे तुम्ही फॉर्मला दोन भागांत वेगळे करू शकता. जिथून फॉर्मचे दोन भाग करायचे आहे तेथे कर्सर नेऊन section icon वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा फॉर्म दोन भागांत वेगळा होईल.

Settings:- सेटिंग्स बदलण्यासाठी setting बटनाचा उपयोग केला जातो. ह्यात Email जोडने, प्रश्न उत्तरांची सेटिंग्स तसेच प्रेझेंटेशन कसे तयार झाले? हे पाहण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. तुम्ही required प्रश्न तसेच ईमेल गोळा करण्यासाठी डिफॉल्ट पर्याय setting द्वारेच चालू करू शकता. हे दोन्ही ऑप्शन चालू केल्यानंतर पुढील प्रश्नांना डिफॉल्ट सेटिंग्स लागू होते.

Theme option:- तुम्हाला जर तयार झालेल्या फॉर्मचे बॅकग्राऊंड बदलणे, थीम कलर आणि फॉन्ट स्टाइल बदलण्यासाठी ह्या ऑप्शनचा उपयोग होतो. ह्यात HEADER IMAGE ह्या ऑप्शनद्वारे हेडरमध्ये आपण इमेज इन्सर्ट करू शकतो.

Preview बटन:- थीम ऑप्शनच्या बाजूलाच preview बटन आहे. आपला फॉर्म किती तयार झाला व तो दिसायला कसा आहे? हे पाहण्यासाठी preview बटनाचा उपयोग होतो.

Undo/redo:- हे दोन पर्याय अनुक्रमे मागील क्रिया व पुढील क्रिया परत आणण्यासाठी आहेत.

 

Google form ची माहिती ईमेल द्वारे कशी प्राप्त करावी? How to get notification of email from google form Marathi?

 

तुमच्या google form पासून मिळणारा डेटा पाहण्यासाठी, google form उघडून response ह्या बटणावर क्लिक करा. तुम्ही ईमेल प्राप्त करून देखील डेटा पाहू शकता. त्यासाठी पुढील क्रिया करा.

 

 

1- सर्वप्रथम, तुम्ही तयार केलेला google form उघडा.

2- Response ह्या बटणावर क्लिक करा.

3- उजव्याबाजूस तीन डॉटचे ऑप्शन दिलेले असेल,त्यावर क्लिक करा.

4- तेथे ‘get email notifications for new responses’ हे ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करा.

 

आता तुम्ही ईमेल नोटिफिकेशन सुरू केली आहे. प्रत्येक response विषयी डेटा तुम्हाला ईमेलद्वारे प्राप्त होईल.

 

Google form ला कसे शेअर करावे? How to share google form in Marathi?

तुम्ही google form तयार केल्यानंतर त्यावर response मिळवण्याची वेळ येते. तुम्ही google form ची लिंक सोशल मीडियावर शेअर करू शकतात. तसेच, ईमेल पाठवू शकता. Google formला वेबसाइटवर देखील embed केले जाऊ शकते.

 

तर मित्रांनो google form in Marathi ह्या लेखात आपण google form विषयी माहिती पाहिली. ह्यात google form मध्ये लॉगिन करण्यापासून ते फॉर्म तयार करण्यापर्यंत आपण माहिती घेतली. तुम्हाला हा लेख आवडल्यास ह्याला नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंटद्वारे आम्हाला विचारा. धन्यवाद!

 

Leave a Comment