OYO meaning in Marathi- OYO म्हणजे काय? OYO चा फुल-फॉर्म

oyo meaning in marathi- oyo विषयी संपूर्ण माहिती मराठीत!

oyo meaning in marathi:-तुम्ही जर काही कामासाठी किंवा सहज कुठे प्रवास करत असाल तर, तुम्हाला राहण्याच्या सोयीसाठी हॉटेल बूक करावे लागते. परंतु, आपल्याला माहिती नसते की कोणत्या हॉटेल मध्ये चांगली सुविधा असेल, किंवा कोणते हॉटेल अधिक परवळणारे म्हणजेच कमी खर्चाचे असेल. आपण एखाद्या स्थानास सतत भेट देत राहीलो तर आपणास तेथे राहण्याच्या सोयीबद्दल माहिती असते. परंतु, पहिल्यांदाच एखाद्या ठिकाणास भेट दिल्याने आपण तेथील हॉटेलसाठी जास्त पैसे मोजतो आणि त्याबदल्यात आपली गैरसोय देखील होते. अशा वेळेस OYO सारखे प्लॅटफॉर्म आपल्यासाठी कामी येतात. आपण आज “OYO म्हणजे काय? OYO meaning in Marathi. OYO चे फायदे.” ह्या लेखात OYO प्लॅटफॉर्म विषयी माहिती पाहणार आहोत. चला तर पाहुयात!

oyo meaning in marathi
oyo meaning in marathi

What is oyo meaning in Marathi?- oyo काय आहे?

 

OYO हे भारताचे एक सर्वश्रेष्ठ ऑनलाइन हॉटेल बूकिंगचे प्लॅटफॉर्म आहे. तसेच OYO ही भारतातील सर्वश्रेठ hospitality कंपनी आहे. ज्याप्रकारे आपण एखाद्या फिल्मचे टिकिट bookmyshow द्वारे बूक करतो त्याचप्रकारे OYO हे ऑनलाइन हॉटेल बूकिंगचे काम करते. OYO ची स्थापना 2013 साली करण्यात आली होती. आणि कमी कालावधीतच OYO ने भारतभर प्रसिद्धी मिळवली.

आपल्याला आवश्यक सर्व सुविधा आणि आपल्या बजेटनुसार OYO वर हॉटेल मिळतात. एखाद्या ठिकाणी हव्या असलेल्या सोयिस्कर हॉटेलला बूक करून आपण तेथे राहू शकतो. OYO द्वारे खूपसारे हॉटेल बूक केले जातात. हयाद्वारे आपण कुठल्याही स्थानावर हॉटेल बूक करू शकतो. OYO द्वारे बूकिंग झाल्यावर लगेच आपण हॉटेल रूम मध्ये चेक-इन करू शकतो. OYO च्या सर्विसमुळे चांगले हॉटेल मिळवणे सोपे झाले आहे. OYO ची सुरुवात झाल्यापासून, त्याची वेगाने प्रसिद्धी झाली. जगभरात हॉटेल बूकिंगची सुविधा देणार हे तिसरे सर्वात मोठे अॅप्लिकेशन किंवा प्लॅटफॉर्म आहे. OYO ला बजेट-फ्रेंडली रूम म्हणून देखील संबोधले जाते.

OYO full form in marathi

 

o.y.o चा फूल-फॉर्म ‘on your own’ असा होतो. ह्याचा उच्चार ऑन यॉर ओनअसा होतो. तर तुमचे स्वत:चे असा त्याचा अर्थ होतो.

OYO rooms ह्याचा अर्थ तुमच्या स्वत:च्या मालकीचे रूम असा होतो.

History of OYO in marathi– OYO ची स्थापना व इतिहास

OYO ची स्थापना रितेश अग्रवाल  ह्यांनी केली होती. ते OYOचे founder व सध्याचे CEO आहेत. रितेश अग्रवाल हे ओडिशा राज्यातील रायगडा ह्या ठिकाणचे आहे. त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी OYO ची सुरुवात केली. OYO हे एका रात्रीत यशस्वी झाले नाही. OYO च्या यशामागे काही अडचणी आणि खडबडीत टप्पे आले आहेत. रितेश अग्रवाल ह्यांनी OYO च्या कल्पनेतून फंडिंगसाठी गुतवणूकदारांना आकर्षित केले.

रितेशला प्रवासाची जास्त आवड असल्याने तो अनेक ठिकाणास भेट देत असे. तेव्हा, हॉटेलमध्ये राहावे लागत असतांना त्याला हॉटेल रूमचे भाडे जास्त मोजावे लागत असे. पण,त्या बदल्यात चांगल्या सुविधा दिल्या जात नव्हत्या. अशा अनेक अडचणीच्या त्यांना अनुभव होता. आणि लहानपणापासून entruprenuer म्हणजेच उद्योगपती बनण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी OYO ची स्थापना केली. सुरूवातीस ह्याचे नाव Oravel Stays Pvt. Ltd. असे होते. आणि ते ऑफलाइन पद्धतीने काम करत होते. त्यानंतर हे ऑनलाइन आले आणि ह्याचे नाव OYO rooms असे ठेवले गेले.   

2013 मध्ये स्थापना झाल्यानंतर, OYO ने देशभरातील हॉटेल्समध्ये खोल्या विकत घेऊन बूकिंग करण्याची सुविधा केली आणि त्यांचे OYO मध्ये रूपांतर केले. आपल्या अॅप्लिकेशन आणि वेबसाइट प्लॅटफॉर्मचा वापर करणार्‍यांसाठी निवास व्यवस्था चांगली सोयिस्कर आणि बजेटमध्ये परवडणारी बनवणे हे कंपनीचे उद्दिष्ट होते. 2013 नंतर OYOच्या वापर्कर्त्यांत सातत्याने वाढ झाली आहे. OYO ने सुरूवातीस फक्त भारतात आपल्या सेवा सुरू केल्या.

 

त्यांनी 2018 मध्ये मलेशियात सर्विस देण्याचे सुरू केले. आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला. हळूहळू संयुक्त अमेरिका, चीन, युएई, सिंगापूर, इंडोनेशिया अशा मोठमोठ्या देशांत ऑनलाइन हॉटेल रूम बूकिंग ची सुविधा केली. आणि आज, स्थापनेच्या 8 वर्षानंतर, OYO जगातील 80 हून अधिक देशांमधील मोठमोठ्या 800 शहरांमध्ये ते कार्यरत आहे.

 

2018 मध्ये OYO वरुन 75 मिल्यन,म्हणजेच 7 कोटी 50 लाख एवढे रूम्स बूक केले गेले. विशेष म्हणजेच 2017 मध्ये एकूण 13 मिल्यन(1 कोटी 30 लाख) आणि जवळजवळ 6 पटीने 2018 मध्ये रूम बूक केल्या गेल्या. 2019 ह्या संपूर्ण वर्षात OYO ची कमाई साडेचार पटीने वाढली. 

कोविडच्या प्रकोपामुळे OYO कंपनीलाही मोठा फटका बसला होता. त्याचा व्यवसाय 50 ते 60 टक्के पेक्षा कमी झाला. तसेच त्यांचा हॉटेल मालकांचे देखील 75 टक्के एवढे नुकसान झाले. 

 

Benefits of OYO in Marathi- OYO चे फायदे

 

OYO द्वारे हॉटेल बूकिंग करण्याची फायदे अनेक आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या बाबींविषयी आपण पाहुयात.

तुम्ही दुसर्‍या देशात किंवा कुठेही प्रवास केल्यास OYO रूम्स द्वारे तुम्ही हॉटेल बूक करू शकता. आणि शिल्लक हॉटेल रूम शोधायच्या त्रासापासून स्वत:ला वाचवू शकता. OYO द्वारे आपल्या बजेटनुसार आपणास रूम मिळतात. हा प्रत्येकासाठी मोठा फायदा आहे. OYO ची अशीही सुविधा आहे की, हॉटेलमध्ये पोहचण्याअगोदरच तुम्ही एक रूम, तीन व्यक्तींसाठी रिजर्व करून ठेवू शकता.

OYO बुजेटनुसार रूम शोधण्यास मदत करते. आणि, हेच वैशिष्ट्य प्रत्येक OYO वापरकर्त्याला पसंद आहे. चांगल्या सुविधा असलेल्या हॉटेल्स रूम वर बूकिंगसाठी तुम्हाला सरासरी 399/- रु. एवढी किमत मोजावी लागते. OYO तुम्हाला hourly रेट म्हणजेच दर तासाला दर देण्याची सुविधा देखील देते. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी फक्त काही तास थांबावे लागत असेल. तर तुम्ही, दर तासाचे भाडे देखील देऊ शकता. आणि, तेथे राहू शकता. ग्राहकांना म्हणजेच प्रवाशांना चांगली सेवा देणे हाच OYO चा उद्देश असल्याने OYO हॉटेलमध्ये राहण्याचा चांगला अनुभव वापरकर्त्यांना येतो.   

OYO चे मोबाइल ऐप आणि वेबसाइट यूजर फ्रेंडली आहे. ज्याने वापरकर्ते सहजतेने काही क्लिक मध्ये जवळपास किंवा दूरचे हॉटेल रूम बूक करू शकता. खुठेही जाण्यापूर्वी आपण घर बसल्या OYO द्वारे हॉटेल बूक करून राहण्याची सोय करू शकतो. OYO वरून पाहिजे तेव्हा रूम बूक करू शकतो. आणि गरज नसल्यास रूम बूकींग कोणत्याही चार्जेसविना कॅन्सल देखील करू शकतो.

How to create account on OYO in marathi? OYO वर account कसे तयार करावे.

मोबाइल मध्ये OYO वर अकाऊंट तयार करण्यासाठी पुढील क्रिया करा.

1. सर्वात अगोदर तुमच्या फोनच्या play store ऐप मध्ये प्रवेश करा. तुमच्या कडे Apple iOS असल्यास तुम्ही iOS स्टोर मध्ये जा. त्यांनतर सर्च बार मध्ये OYO असे टाइप करून सर्च करा.

2. तुम्हाला पहिल्याच नंबरवर OYO हे अॅप्लिकेशन दिसून येईल. त्यास install बदनावर दाबून install करा.

3. झाल्यानंतर applicationला ओपेन करा. ऐप ओपेन झाल्यानंतर आपल्याला मोबाइल नंबर विचारला जाईल. मोबाइल नंबर दिल्यानंतर OTP दिलेल्या मोबाइल नंबर वर पाठवला जाईल.

4. OTP टाकल्यानंतर पुढील पानावर ई-मेल आणि तुमचे नाव टाका. आणि Referrel Code च्या ठिकाणी GANEY53YJL हा कोड टाकल्यास तुम्हाला पहिल्या रूम बूकींगवर काही सूट मिळेल.

आता तुमचे अकाऊंट तयार झाले आहे.

तुम्ही लॅपटॉप/संगणकावर देखील OYO अकाऊंट तयार करू शकतात. त्यासाठी, पुढील क्रिया करा.

1. सर्वप्रथम https://www.OYOrooms.com/ ह्या वेबसाइट वर जा आणि वरील उजव्या कोपर्‍यातील Login/sign-up ह्या बदनावर क्लिक करा.

2. त्यानंतर मोबाइल नंबर टाइप करून, दिलेल्या मोबाइल नंबरवर आलेला OTP देऊन, तुम्ही OYO वर account तयार करू शकता.

3. पुढील क्रियेत तुम्हाला नाव, आणि ई-मेल विचारले जाईल. तुमचे नाव आणि ई-मेल दिल्यानंतर referral code च्या जागी GANEY53YJL हा कोडे नक्की टाका. जेणेकरून तुम्हाला cashback offer चा लाभ होईल.

आता लॅपटॉप किंवा संगणकावर तुमची OYO rooms चे अकाऊंट तयार केले आहे.

How to book hotel on OYO? OYO वर हॉटेल रूम कशाप्रकारे बूकींग करावे?

1. सर्वप्रथम OYO चे अॅप्लिकेशन ओपेन करा. लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे हॉटेल बूक करण्यासाठी OYO ची Website ओपेन करा.

2. पहिल्याचा पेजवर तुम्हाला हॉटेल आणि त्यांची किमत तुम्हाला दिसेल. त्याशिवाय तुम्ही 3. दिलेल्या सर्च बार मध्ये हव्या असलेल्या ठिकाणास सर्च करू शकता.

4. तुमचे बजेट, पाहिजे असलेले ठिकाण आणि सोयीनुसार हॉटेल निवढा.

5. त्यानंतर चेक-इन आणि चेक-आऊट ची तारीख निवढा. त्यासोबतच्या ऑप्शनमध्ये एका रूम थांबणार्‍या व्यक्तींची संख्या निवढा.

6.शेवटी continue to booking ह्या बटनावर क्लिककरून तुम्ही पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर तुमची booking मान्य होईल.

How to cancel booking on OYO? OYO वर झालेली बूकींग कॅन्सल कशी करावी.

तुम्हाला जर काही कारणावस्त OYO वर बूक केलेले हॉटेल कॅन्सल करायचे असल्यास तुम्ही सहजपणे ते कॅन्सल करू शकता. त्यासाठी पुढील क्रिया करा.

1. OYO ची वेबसाइट किंवा OYO ऐप ओपेन करून लॉगिन करा.

2. त्यानंतर my booking ह्या ऑप्शनवर जा.

3. आता तुम्हाला तुम्ही बूकिंग केलेली हॉटेलची नावे दिसतील. त्यानंतर कॅन्सल करायचे बूकिंग निवढा. आणि त्यासमोरील view details ह्या बटणावर क्लिक करा.

4. त्यानंतर CANCEL THE BOOKING ह्या ऑप्शन वर क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्ही OYO वरील बूकिंग कॅन्सल करू शकता.

तर मित्रांनो, तुम्हाला OYO काय आहे?OYO चा फुल फॉर्म तसेच OYO meaning in Marathi हयांविषयी सर्व माहिती मिळाली असेल. OYO विषयी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ह्या लेखात मिळाले असेल. जर तुम्हाला OYO विषयी आणखी काही शंका/प्रश्न असल्यास आम्हाला नक्की कमेन्ट करून विचारा. आम्ही नक्की त्याचे उत्तर देऊ. आणि आमच्या मराठीकृपा ब्लॉगला सतत भेट देत रहा. धन्यवाद!  

Leave a Comment