म्युचल फंड म्हणजे काय ? Mutual Fund in Marathi | Mutual Fund Information In Marathi
Mutual Fund in Marathi : मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केटचे काहीच ज्ञान नाहीये पण तुम्हाला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवयची इच्छा आहे का ? तुम्हाला शेअर मार्केट शिकायला वेळ नाहीये पण शेअर मार्केट मधल्या रिटर्न चा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे का ? मग तुमच्यासाठी म्युचल फंड हा चांगला पर्याय आहे आजच्या या पोस्ट मध्ये आपण म्युचल फंड म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेहमीप्रमाणे ही पोस्ट तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे
What is Mutual Fund in Marathi | म्युचल फंड म्हणजे काय ?
मित्रांनो म्युचल फंड मध्ये म्युचल या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया एकापेक्षा जास्त लोक जेव्हा कोणतीही गोष्ट बरोबरीने करतात त्याला म्युचल असे म्हणतात . त्याचप्रमाणे एका पेक्षा जास्त लोक जेव्हा एका फंडमध्ये गुंतवणूक करतात त्याला Mutual fund असे म्हणतात कोताही म्युच्युअल फंड एक Asset Management Company कंपनी चालवत असते म्हणजेच (AMC) चालवत असते त्या कंपनीला AMC सुद्धा म्हटले जाते हि amc कंपनी नव नवीन फंड बाजारात आणत असते आणि त्या फंड ची जाहिरात टीव्हीवर वर्तमानपत्रांमध्ये अशा वेगळ्या ठिकाणी करते जेणेकरून पब्लिक त्या फंड मध्ये पैसे गुंतवते आपण शंभर रुपयांपासून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो.
म्युचल फंड कसे काम करत ?| How much mutual fund work in marathi
समजा आपण पाच हजार रुपये XyZ म्युचल फंड कंपनी मध्ये गुंतवले तेव्हा आपल्याला पाच हजार रुपयांचे युनिट्स मिळतात आणि प्रत्येक युनिट ला एक किंमत असते ज्याला (NAV ) Net Asset Value म्हणतात ज्यावेळेस पब्लिक एखाद्या फंड मध्ये आपले पैसे गुंतवते त्या फंड ला (AUM) म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणतात आताही ॲसेट मॅनेजमेंट कंपनी प्रत्येक म्युच्युअल फंड साठी एक फंड मेनेजर नियुक्त करते त्याच्या हाताखाली एक तज्ञ लोकांची टीम दिली जाते ती मार्केटचा अभ्यास करते फंड मॅनेजर आणि ही रिसर्च टीम निर्णय घेतात या फंड मध्ये आलेले पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे त्यामुळे आपण एकदा पैसे गुंतवले की त्याकडे सतत लक्ष देण्याची गरज नसते .
आपल्या वतीने फंड मॅनेजर आपण गुंतवलेल्या पैशांची काळजी घेत असतो त्यासाठी ते आपल्याकून गुंतवणुकीतील एक ते दोन टक्के रक्कम फी आकारतात त्यालाच एक्सप्रेन्स रेशो असे म्हणतात. म्हणून कुठल्याही फंड मध्ये गुंतवणूक करताना त्याचा Expense Ratio जेवढा कमी असेल तेवढे आपल्यासाठी चांगले असते .
Some example of mutual fund in marathi
आता आपण एक उदाहरण बघूया समजा एका जमीन मालकाला आपले अडीच एकर जमीन विकायची आहे. अडीच एकर म्हणजे शंभर गुंठे आणि 1 गुंठायचा भाव आहे एक लाख रुपये गुंठा मित्रांनो हे उदाहरण मी फक्त तुम्हाला Mutual Fund समाजन्यासाठी घेतोय बाकी आकड्यांवर जाऊ नका आता एक लाख रुपये गुंठा म्हणजे अडीच एकराचे होतात एक करोड रुपये सामान्य माणसाला एवढे एक करोड रुपये देऊन जमीन विकत घेणे शक्य नाही पण त्याला एक लाख रुपये देऊन एक गुंठा घेणे शक्य आहे.
मग हा जमीन मालक काय करतो अशी एक गुंठा घेणारी दोन गुंठा घेणारी घेणारे लोक तयार करतो आणि अशा लोकांना ही जमीन विकून टाकतो समजा एखाद्याने एक गुंठा जमीन एक लाख रुपये देऊन विकत घेतली पुढे काही वर्षाने या जमिनीचे भाव वाढले ते झाले दीड लाख रुपये आता या व्यक्ती ने विचार केला मला एक लाखाचे आता दीड लाख रुपये मिळत आहे मग हा एक गुंठा जमीन दुसऱ्याला विकतो आणि पन्नास हजार नफा एका गुंठ्यात मागे कमवतो आता येथे जमिनीचा मालक म्हणजे ती म्युचल fund कंपनी इथे गुंठा म्हणजे युनिट आणि त्याची किंमत जी एक लाख होती ती आहे (NAV) म्हणजे Net Asset Value .
मला असे वाटते तुम्हाला आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले असेल म्हणजे जेव्हा आपण एखाद्या म्युचल फंड मध्ये पैसे गुंतवतो तेव्हा आपल्याला युनिट्स मिळतात प्रत्येक युनिट ची एक किंमत असते पुढे जाऊन ते म्युच्युअल फंड कंपनीने प्रॉफिट दिला तेव्हा त्या युनिटची किंमत वाढलेली असते किंवा पुढे जाऊन काही कारणाने ती म्युचल फंड कंपनी लॉस मध्ये गेली तेव्हा युनिट्स ची किंमत कमी झालेली असते .
म्युचल फंड मध्ये पैसे कितीदिवसात वाढतात
म्युचल फंड मध्ये जेवढा जास्त काळ तुम्ही पैसे ठेवायला तेवढा तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यता जास्त असते एक्स्पर्ट लोकांचं म्हणणं आहे की म्युचल फंड मध्ये कमीत कमी पाच ते सात वर्षांसाठी गुंतवणूक केली की चांगला प्रॉफिट होऊ शकतो आणि त्यापेक्षा जास्त ठेवले तर अजुनच उत्तम mutual Fund चा प्रॉफिट हा कंपाउंड इंटरेस्ट च्या स्वरूपात होत असतो कंपाउंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढव्याज .
म्युचल फंड मध्ये गुंतवणुकीचे प्रकार
SIP : Mutual Fund मध्ये आपण दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो पहिला म्हणजे ( SIP ) चा अर्थ आहे Systematic Investment Plan म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना SIP मध्ये तुम्ही एक ठराविक रक्कम नियमितपणे म्युचल फंड मध्ये गुंतवणून करू शकता जसे की प्रत्येक महिन्याला तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी SIP मध्ये तुम्ही शंभर रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक करू शकता sip वर लवकरच एक सविस्तर पोस्ट आम्ही बनवणार आहोत.
Lumpsum : म्युचल फंड मध्ये दुसऱ्या गुंतवणूकीचा प्रकार आहे (Lumpsum) म्हणजे एकसाथ पैसे भरणे आपण SIP मध्ये नियमित पैसे भरतो इथे Lumpsum मध्ये आपण एकसाथ पैसे भरत असतो .
Read Also : OYO meaning in Marathi- OYO म्हणजे काय?
Mutual Fund चे अनेक प्रकार आहे त्यामध्ये आपण सहजपणे गुंतवणूक करूशकतो
- Equity Mutual Fund
- Equity Linked Saving Scheme (ELSS)
- Index Fund
- Debt Fund
- Hybrid Fund
तर मित्रांनो ह्या लेखात एवढेच. जर तुम्हाला हा लेख उपयोगी आला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला कमेंट मध्ये विचारा. त्याचे उत्तर नक्की देऊ. धन्यवाद@
2 thoughts on “म्युचल फंड म्हणजे काय ? Mutual Fund in Marathi 2022”